रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिला टाटाकडून एक खास भेट देण्यात आली आहे. शुक्रवारी आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्यानंतर या कंपनीने महिला क्रिकेटरला तुटलेली काच फ्रेम करून दिली. ही तीच काच आहे जी एलिस पेरीने तिच्या स्फोटक शॉटने तोडली होती. महिला प्रीमियर लीगच्या ११व्या सामन्यात या ऑस्ट्रेलियन खेळाडूने दमदार षटकार मारून स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या कारची काच फोडली होती.

– quiz

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

यूपीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पेरीने १९व्या षटकात दमदार षटकार ठोकला. दीप्ती शर्माविरुद्ध तडाखेबंद फलंदाजी करताना पेरीने हा दणदणीत षटकार मारत स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या कारची काच तोडली, पेरीला कळताच तिची प्रतिक्रिया पण व्हायरल झाली होती. आरसीबीने हा सामना २३ धावांनी जिंकला होता.

कारच्या तुटलेली त्या काचेचा भाग पेरीला टाटांनी भेट म्हणून दिला. कारची तुटलेली काच भेट म्हणून देण्याची क्रिकेटच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ असावी. पेरी हे गिफ्ट घेतानाचा फोटो आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. आता संघाचा सामना १७ मार्चला रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आरसीबी प्रथमच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला असून विजेतेपदावर त्यांची नजर असेल.

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात एलिस पेरीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. एमआय विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ३३ वर्षीय खेळाडूने स्फोटक फंलदाजी केली आणि तिच्या आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आरसीबीकडून ६६ धावा केल्या आणि एक विकेट घेतली. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. WPL च्या दुसऱ्या हंगामात पेरीने आतापर्यंच ३१२ धावा केल्या असून ऑरेंज कॅप सध्या तिच्याकडे आहे.