आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावापूर्वी बहुतेक फ्रेंचायझी त्यांच्या नवीन कर्णधाराचा शोध घेत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद, लखनऊ, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांची नजर अशा खेळाडूंवर आहे, जे आयपीएलमध्ये संघाची धुरा सांभाळण्यास सक्षम आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर लखनऊ किंवा अहमदाबाद संघाचा कप्तान होणार अशा अनेक अटकळ बांधल्या जात होत्या. पण तसेही झाले नाही. आता श्रेयस अय्यरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नजर श्रेयस अय्यरवर आहे. आरसीबी संघाला पुढील हंगामासाठी कर्णधाराची गरज आहे. अशा स्थितीत श्रेयस अय्यर हा आरसीबीसाठी उत्तम ठरू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत आयपीएल खेळणारा बंगळुरू संघ आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या वर्षी विराटने बंगळुरूचे कर्णधारपद सोडले.

श्रेयस अय्यरला आयपीएलच्या १५व्या हंगामात नवीन संघ मिळणार आहे. श्रेयस मेगा लिलावात सहभागी होणार आहे. बंगळुरूव्यतिरिक्त कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज फ्रेंचायझींची नजर या खेळाडूवर आहे. मेगा लिलावात अय्यरला चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. अय्यरकडे उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य आहे, ज्यामुळे त्याला अहमदाबाद आणि कोलकाता यांनी आधीच ऑफर दिली आहे. आता या शर्यतीत बंगळुरू संघही सामील झाला आहे.

हेही वाचा – IND vs SA : नवा कॅप्टन बोलत राहिला अन् विराट ऐकत राहिला..! BCCIनं शेअर केले PHOTO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाखाली दिल्ली कॅपिटल्सला नवी उंची दिली. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने २०२० मध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. ज्यामध्ये त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी आयपीएलबाबतचा सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन वेळा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करावे लागले आहे. यावेळीही करोनाचे संकट वाढत असून भारतात आयपीएलचे आयोजन करणे कठीण होत आहे.