बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामना खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज ड्रामा ठरला. या सामन्यामध्ये धोनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही चेन्नईचा एका धावेने पराभव झाला. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. मात्र अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद केले आणि बंगळुरुने सामना एक धावेने जिंकला. सामना जरी विराटच्या संघाने जिंकला तरी सोशल नेटवर्किंगवर चर्चा मात्र धोनीचीच होती. जुना धोनी पुन्हा पहायला मिळल्याचा आनंद अनेकांनी ट्विटवरुन व्यक्त केला. धोनी विश्वचषकासाठी योग्य नाही असं म्हणणाऱ्यांना धोनीने दिलेले हे उत्तर असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अगदी सिने कलाकारांपासून सामान्यांपर्यत अनेकांनी धोनीची स्तृती केली आहे. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विट…

धोनीसारखा दुसरा नाही

इतकं थंड असावं

दुसरं कोणीही हे करु शकलं नसतं…

क्रिकेटची स्क्रीप्ट धोनीनेच लिहावी

तुला पाहणं म्हणजे स्वप्नच…

धोनी फॉर पीएम

नियंत्रण

पंतप्रधान पदासाठी उभा राहिला तर…

इतर कोणीही नाही

अजूनही धोनीचे विरोधक आहेत का?

सुरुवात करणारे अनेक असतात पण…

तो षटकार म्हणजे चपकार

अटॅक येता येता रहिला

पंतला वाट पहावी लागेल २०२७ ची

ती लोकं आता लपली

मी आनंदी कारण…

शेवटची ओव्हर विसरणे शक्य नाही

काटा आला अंगावर

विजय किंवा पराभवापेक्षा

…म्हणून चेन्नई हरली

२०० षटकार मारणारा पहिलाच…

आयुष्य सुंदर आहे फक्त धोनी एवढा आत्मविश्वास आयुष्यात हवा…

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. पण धोनीने IPL कारकिर्दीतील इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनीने ८४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या षटकात तर त्याने ४, ६, ६, २ आणि ६ असे पहिले ५ चेंडू टोलवले, पण अखेरच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला धावबाद केले आणि बंगळुरूचा विजय झाला.