बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरुदरम्यान झालेल्या अटीतटीच्या समाना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र हा चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय पंचांनी वेळीच दिला असता तर कदाचित सामन्याचा निकाल बंगळुरूच्या बाजूने लागला असता. म्हणूनच निर्णायक चेंडूकडे दूर्लक्ष करणाऱ्या पंचांबरोबरच नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सचा संघ, संघ मालक, बीसीसीआयलाही ट्रोल केले आहे. या नो बॉल वादानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर अनेक मिम्स शेअर केले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल मिम्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा झाला नो बॉल हो बॉल

पंचांचा दोष नाही कारण त्यांना असं दिसत होतं

तीन पंच हवेत

पंचच मॅन ऑफ द मॅच

काय काय शिकला मलिंगाकडून

पंचच विकला

विराट पंचांना नो बॉल दाखवताना

नो बॉलकडे पंच लक्ष देताना

गेम चेंजर

सामन्यातील पंच

ते म्हणाले…

गांजा?

फरक

सेटिंग?

बाराव्या खेळाडूमुळे जिंकलो

पुढच्या लग्नाचं आमंत्रण

सगळं आमचंच

कोहलीपेक्षा चांगले खेळाडू

पाय बाहेर पडला तेव्हा

मी केलयं

हा पंच हवा होता

नक्की काय झाले शेवटच्या षटकामध्ये

शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाच्या या षटकामध्ये पहिल्या पाच चेंडूत बंगळुरुला १० धावा काढण्यात यश मिळाले. त्यामुळे विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज होती मात्र षटकार मारला तरी सामना अर्णिर्नित राहून त्याचा निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागला असता. अखेरच्या चेंडूवर बंगळूरच्या फलंदाजांना एकच धाव घेता आली आणि मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. मात्र या गोंधळामध्ये मलिंगाने टाकलेले शेवटचा चेंडू नो बॉल होता याकडे पंचांचे लक्ष गेले नाही. ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर पंचाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत मुंबईनेच सामना जिंकल्याचे जाहिर करण्यात आले.

विराट संतापला

सामना संपल्यानंतर लसिथ मलिंगाने टाकलेला शेवटचा चेंडू नो- बॉल असल्याचे स्पष्ट झाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पंचांचा निर्णय अंतिम असल्याने मुंबई इंडियन्सला विजयी घोषित करण्यात आले. मात्र हा चेंडू नो असल्याचा निर्णय पंचांनी वेळीच दिला असता तर कदाचित सामन्याचा निकाल बंगळुरूच्या बाजूने लागला असता. म्हणूनच सामना संपल्यानंतर विराटने याप्रकरणात आपला राग व्यक्त केला. ‘आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. हा आयपीएलचा सामना होता एखाद्या क्लब क्रिकेटचा नाही. पंचांनी मैदानात डोळे उघडे ठेवून उभं राहणे अपेक्षित आहे. शेवटच्या चेंडूवर पंचाचा निर्णय मूर्खपणाचा होता. इथे थोड्याश्या फरकाने समान्याच्या निकालावर फरक पडतो. इथे काय सुरु आहे मला अंदाजच येत नाहीय. पण पंचांनी मैदानावर जास्त सजग राहिले पाहिजे. अशा अटीतटींच्या समान्यांमध्ये पंचांनी जास्त काळजी घ्यायला हवी.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb vs mi ipl 2019 viral memes over denied no ball
First published on: 29-03-2019 at 11:31 IST