जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक महत्वाच्या स्पर्धा करोनाच्या धसक्यामुळे रद्द झाल्या आहेत. भारतातही बीसीसीआयने आयपीएलसह सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत फुटबॉलपटू रोनाल्डोने आपलं पोर्तुगालमधील हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुलं केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – करोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोची फ्री-किक ! पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली

याचसोबत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेसीही आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे.

मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही घरी राहत वाचन करणं पसंत केलं आहे.

कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या चाहत्यांना खंबीर राहण्याचा सल्ला दिलाय.

महेंद्रसिंह धोनीनेही आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे चेन्नई सोडण्याचा निर्णय घेतलाय. तर पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रार्थना केली आहे.

आतापर्यंत चीनमध्ये करोनामुळे सर्वाधिक रुग्ण संक्रमित झाले असून त्याखालोखाल इटलीमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मुंबई, दिल्ली यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading family time what sports stars are up to as world halts psd
First published on: 15-03-2020 at 15:54 IST