मेलबर्नमधील पदार्पणाच्या कसोटीत सपेशल अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलच्या कामगिरीवर सर्वानी टीका केली होती. पण पुढच्याच कसोटीत संधी मिळाल्यानंतर राहुलने त्या संधीचे सोने केले. ‘‘माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. पदार्पणाच्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वरच्या क्रमांकावर बढती मिळाल्याने मैदानावर स्थिरावण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. खेळपट्टीकडूनही चांगली मदत मिळत होती. प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करायचे, हे उद्दिष्ट मी ठेवले होते. आव्हानाचा सामना करताना आनंद होत होता. बुधवारच्या दिवसातील अखेरची २५ षटके खेळून काढल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला होता,’’ असेही त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2015 रोजी प्रकाशित
कामगिरीवर समाधानी राहुल
मेलबर्नमधील पदार्पणाच्या कसोटीत सपेशल अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलच्या कामगिरीवर सर्वानी टीका केली होती.
First published on: 09-01-2015 at 07:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relieved with my innings lokesh rahul