२०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत असलेली टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी आशिष नेहराने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरातच्या संघाला विजेता बनवणाऱ्या आशिष नेहराने भारतीय संघाने आता आपल्या ११ खेळाडूंचा निर्णय घ्यावा आणि त्यांना प्रत्येक सामन्यात संधी द्यावी, असे म्हटले आहे. आता भारताने सामने जिंकण्यापेक्षा त्यांचा शेवटचा संघ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे जो त्यांना विश्वचषकात उतरावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकबज या स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “विश्वचषकाची वेळ जवळ आली आहे, आता सामन्याचा निकाल हा आमचा प्राधान्यक्रम नसावा. संघाने त्यांना काय हवे आहे ते ठरवायचे आहे. तीन फिरकी गोलंदाजांसह भारत घरच्या मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात बहुतेक संघ असे करणार नाहीत.” तो पुढे म्हणाला, “संघात पाच गोलंदाज आहेत. याचा अर्थ तुम्ही गोलंदाजीकडे विशेष लक्ष देत आहात. कारण आगामी विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक वेगवान गोलंदाजीची काळजी घेत आहेत.”

हेही वाचा   :  आकडेवारीच्या तुलनेत टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पारडे मजबूत, जाणून घ्या.. 

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

आशिष नेहराच्या मते, भारतीय संघाने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. फलंदाजीत भारत निर्धारित क्रमाने खेळला नाही. पाकिस्तानसमोरील १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अडचणी आल्या. फलंदाजी क्रमाबाबतही संघात अनेक प्रश्न आहेत. टी२० विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापन याबाबत अधिक स्पष्ट होईल, अशी आशा आहे.

हेही वाचा   :  ‘भारतीय क्रिकेट संघ हा एक अब्ज डॉलरचा आहे..’, पाकिस्तानच्या मुख्य अधिकाऱ्याने उडवली मेन इन ब्लू ची खिल्ली 

बुमराह, हर्षलच्या आगमनाने संघ मजबूत झाला

भारताचे आघाडीचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आशिया चषकमध्ये खेळले नाहीत. दोन्ही खेळाडू दुखापतींमुळे संघात नसल्याने भारताची गोलंदाजी कमकुवत वाटत होती. आता हे दोघेही दुखापतीतून सावरले असून पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. मात्र, युवा अर्शदीप सिंगने आशिया चषक स्पर्धेत चमकदार गोलंदाजी करत संघातील आपले स्थान पक्के केले आहे. तो असाच सुरू राहिल्यास विश्वचषकात बुमराहसोबत शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर दिली जाऊ शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right team selection is more important than result ashish nehras valuable advice to rohit avw
First published on: 19-09-2022 at 17:32 IST