20 February 2019

News Flash

Rio 2016: ‘सिंधूने रौप्यपदकासोबत भारतीयांची मनेही जिंकली’

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरलेली सिंधू पहिली भारतीय महिला

पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदकाचे स्वप्न दाखविणाऱ्या पी. व्ही. सिंधूवर पराभवानंतर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरलेली सिंधू पहिली भारतीय महिला आहे. तसेच भारताची ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सायनाने भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. स्पेनच्या कॅरोलिना मारिनसोबत तिने दिलेली लढत भारतीय बॅडमिंटन चाहता कधीच विसरु शकणार नाही असा आहे. पी. व्ही. सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. सिंधूची खेळी वर्षानुवर्षे लक्षात राहील, असे पंतप्रधानांनी  ट्विटवरुन म्हटले आहे. राज्याचे खेळ आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही सिंधूचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले. शतकांचा बादशहा आणि ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत सचिनने देखील सिंधूच्या खेळाचे कौतुक केले आहे. यूवा सिंधूने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. अशा शब्दात सचिनने सिंधूवर स्तूती सुमनांची उधळण केली.

First Published on August 19, 2016 9:44 pm

Web Title: rio 2016 olympicsp v sindhu congrats for the silver