भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०२० वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाला आहे. जानेवारी महिन्याअखेरीस न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी भारत घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांची क्रिकेट मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय खेळाडू आपल्या फिटनेसवर अधिक भर देत आहेत.

अवश्य वाचा – Video : या पंतचं करायचं तरी काय??

ऋषभ पंतने भारतीय संघाच्या फिटनेस ट्रेनरसोबत सराव करत असतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र काही क्षणात पंतचा सराव झाल्यानंतर चहल सरावासाठी येतो….आणि इतक्यात पंत पाठीमागून ट्रेनरला पकडतो. यानंतर दोन्ही खेळाडूंनी मिळून गमतीमध्ये आपल्याच ट्रेनरची धुलाई केली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघाला सराव सामने फार कमी मिळणार आहेत. त्यातच अनेक महत्वाचे प्रश्न संघासमोर आ वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ या सर्व आव्हानांवर मात करत, कशी तयारी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला तरुण आक्रमक फलंदाजांची गरज – विराट कोहली