scorecardresearch

Rishabh Pant : युवराज सिंगच्या ‘त्या’ ट्वीटला ऋषभ पंतने मोजक्या शब्दांत दिले उत्तर, म्हणाला…

पंतच्या शतकी खेळीनंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे एक ट्वीट व्हायरल झाले होते.

Rishabh Pant
ऋषभ पंत (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

Rishabh Pant response to Yuvraj Singh : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने तिसऱ्या निर्णायक सामन्यात शानदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. ऋषभ पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून ‘सामनावीरा’चा पुरस्कार मिळवला. पंतच्या शतकी खेळीनंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे एक ट्वीट व्हायरल झाले होते. ऋषभ पंतने युवराजच्या या ट्वीला उत्तर दिले आहे.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती ऋषभ पंतने अप्रतिम खेळ करत नाबाद १२५ धावा केल्या. तब्बल २७ डावांनंतर त्याला एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक करण्यात यश आले. त्याने शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच युवराज सिंगने एक ट्वीट केले होते. “४५ मिनिटांचे संभाषण कामी आल्यासारखे दिसते. ऋषभ पंत चांगला खेळला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डावाचा वेग वाढवता. हार्दिक पंड्याला पाहून आनंद झाला,” असे ते ट्वीट होते. या ट्वीटला ऋषभ पंतने मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे. “हो नक्कीच युवी पा,” असे ट्वीट ऋषभने केले आहे.

मँचेस्टरमधील विजयानंतर पंत म्हणाला होता, “ही खेळी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी फलंदाजी करत असताना फक्त एका चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. जेव्हा तुमचा संघ दडपणाखाली असतो आणि तुम्ही अशी फलंदाजी करत असता. मी नेहमीच इंग्लंडमध्ये खेळण्याचा आनंद घेतो. येथील वातावरण आणि परिस्थितीचाही आनंद घेतो. तुम्ही जितके जास्त खेळाल तितका जास्त अनुभव मिळतो.”

हेही वाचा – IND vs ENG 3rd ODI : ‘बस करो बस…’, ‘झूम करो झूम..!’ पंत आणि जडेजाची कॅमेरामनसोबत मस्ती

मँचेस्टर येथे झालेल्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून परावभ केला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-१ अशा फरकाने विजय मिळाला. २०१४ नंतर पहिल्यांदाच भारताला इंग्लंडमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकता आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2022 at 10:30 IST
ताज्या बातम्या