टेनिसपटू रॉजर फेडररचा एक चाहता तब्बल ११ वर्षांनंतर कोमातून बाहेर आला आणि त्याचा आवडता टेनिसस्टार अजूनही खेळतोय हे ऐकून या चाहत्याला सुखद धक्काच बसला. जीजस अपॅरिसिओ हा रॉजर फेडररचा चाहता राहिला असून तो ११ वर्षांनी कोमातून बाहेर आल्याने त्याच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण या पठ्ठयाला मात्र रॉजर फेडरर अजून निवृत्त झालेला नाही याचाच अधिक आनंद आहे. कोमातून बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या आईशी संवाद साधला आणि सर्वप्रथम रॉजर फेडरर बद्दल विचारणा केली. रॉजर अजूनही टेनिस खेळतोय हे ऐकून त्याला धक्काच बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉजर आता निवृत्त झाला असेल असे मला वाटले. पण तो अजूनही टेनिस खेळत असून जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असल्याचे मला सांगण्यात आले तेव्हा माझी थट्टा केली जातेय असे वाटले. मात्र, हे खरे असून त्याच्या नावावर आता १७ ग्रँड स्लॅम विजेतेपदांची नोंद असल्याचे कळाले आणि मला  धक्काच बसला, असे जीसस म्हणाला.

००४ साली रॉजरने आपले चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटावले होते. त्यावेळी जीजसने काहीही करून रॉजरला भेटण्याचे ठरविले होते. मात्र, २००४ साली आपल्या मित्रांसोबत स्वत:चा १८ वा वाढदिवस साजरा करीत असताना झालेल्या कार अपघातानंतर जीजस कोमात गेला. त्यानंतर ११ वर्षांनी ऑगस्ट २०१५ मध्ये जीजस कोमातून बाहेर आला. पण आजही त्याचा टेनिस ‘हिरो’ टेनिसकोर्टवर तग धरून १८ व्या ग्रँड स्लॅमसाठी मेहनत करतोय, हे पाहून जीजसला आनंद झाला.

यंदाच्या अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत रॉजरला खेळाताना पाहून जीजस सुखावला. नोवाक चांगला खेळतो पण रॉजर वयाच्या ३४ व्या वर्षही  तितक्याच प्रभावीपणे खेळतोय हे पाहून मन भरून आल्याचे जीजस म्हणतो. त्याला निवृत्त होण्यापूर्वी खेळताना पाहण्याची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचेही तो पुढे म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer fan wakes up from coma stunned to see him as top player
First published on: 23-09-2015 at 13:13 IST