भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात आणखी एका व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. संघासाठी डावपेच प्रशिक्षक म्हणून डच प्रशिक्षक रॉजर व्हान डेन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रॉजर हे भारतीय संघाच्या उच्च कामगिरीचे संचालक व मुख्य प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांना साहायक म्हणून काम पाहतील. जागतिक लीग उपांत्य फेरीपासून त्यांच्या कामकाजास सुरुवात होईल व रिओ ऑलिम्पिक होईपर्यंत त्यांच्याकडे डावपेच प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे.
रॉजर यांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा उच्च कामगिरी प्रशिक्षकाचा दर्जा मिळविला. त्यानंतर त्यांनी नेदरलँड्समधील विविध स्थानिक संघांबरोबर काम केले आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस महंमद मुश्ताक अहमद यांनी सांगितले, रॉजर यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूंना निश्चितपणे होईल. विशेषत: ऑलिम्पिकसाठी तयारी करताना त्यांच्या ज्ञानाचा लाभ आमच्या खेळाडूंना घेता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2015 रोजी प्रकाशित
प्रशिक्षकांच्या ताफ्यात रॉजर व्हान डेन्ट यांचा समावेश
भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात आणखी एका व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.

First published on: 08-11-2015 at 02:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger van den debut in male indian hockey team