Rohan and Rutuja pair won the gold medal in tennis mixed doubles: १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. यावेळी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला.

रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना तैपेई जोडीने ६-२ ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा १०-४ असा पराभव करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत १०-४ असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णाचे दुसरे सुवर्णपदक –

टेनिस मिश्र दुहेरीचा अंतिम सामना एक तास १४ मिनिटे चालला. आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी, पहिला टेनिस फायनल खेळताना त्याने २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीची अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक जिंकले होते. तथापि, २०२३ मध्ये, रोहन बोपण्णा युकी भांब्रीसह पुरुष दुहेरीत १६ फेरीच्या पुढे जाऊ शकला नव्हता.

हेही वाचा – MS Dhoni: माहीचा नवा लूक! महेंद्र सिंग धोनीच्या पोनी-टेल हेअरस्टाइलचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे नववे सुवर्णपदक आहे. या सुवर्णपदकासह, भारताच्या एकूण पदकांची संख्या ३५ झाली आहे, ज्यामध्ये १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. सातव्या दिवशी भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.