रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मर्गीआ या चौथ्या मानांकित जोडीने एटीपी मर्सिडिस चषक टेनिस स्पध्रेचे जेतेपद आपल्या नावावर केले. त्यांनी तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेस आणि ऑस्ट्रियाच्या अॅलेक्झांडर पेया या जोडीचा पराभव करून सत्रातील दुसरे जेतेपद पटकावले.
भारत-रोमानिया जोडीने अंतिम फेरीत ०-१ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत १ तास ११ मिनिटे चाललेल्या सामन्यात ५-७, ६-२, १०-७ अशी बाजी मारली. बोपन्ना-मर्गीआ जोडीने गतमहिन्यात माद्रिद मास्टर्सचे जेतेपद पटकावले होते. बोपन्नाचे हे सत्रातील वैयक्तिक चौथे जेतेपद आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2015 रोजी प्रकाशित
बोपन्ना-मर्गीआ जोडीला जेतेपद
रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मर्गीआ या चौथ्या मानांकित जोडीने एटीपी मर्सिडिस चषक टेनिस स्पध्रेचे जेतेपद आपल्या नावावर केले.

First published on: 15-06-2015 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohan bopanna florin mergea win mercedes cup mens doubles title