भारताच्या रोहन बोपण्णाने त्याचा फ्रान्सचा जोडीदार इडोर्ड रॉजर-वेसलीन याच्या साथीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर लिअँडर पेसनेही रेडेक स्टेपनाकच्या साथीने उपांत्य फेरी गाठली आहे. बोपण्णाची ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही तिसरी वेळ आहे. बोपण्णा-इडोर्ड जोडीने रॉबर्ट लिडस्टेड आणि डॅनियल नेस्टर या जोडीचा ७-५, ७-६(३), ६-७(४), ६-७(३), ६-२ असा पाच सेटमध्ये पराभव केला. तर बोपण्णा व वेसलीनने मागील फेरीत अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेस यांचा पराभव केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
बोपण्णा, पेसची विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक
भारताच्या रोहन बोपण्णाने त्याचा फ्रान्सचा जोडीदार इडोर्ड रॉजर-वेसलीन याच्या साथीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर लिअँडर पेसनेही रेडेक स्टेपनाकच्या साथीने उपांत्य फेरी गाठली आहे.

First published on: 03-07-2013 at 01:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohan bopanna leander paes advance to wimbledon semis