रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने रोहन बोपण्णाने जागतिक क्रमवारीत दमदार आगेकूच केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार बोपण्णाने दोन स्थानांनी सुधारणा करत ११वे स्थान पटकावले आहे. रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदासह बोपण्णा आणि त्याचा सहकारी फ्लोरिन मर्गेआ जोडीने क्रमवारीच्या ३६० गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत सहकारी निवडण्याची मुभा असते.

विक्रमी सातव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आतुर लिएण्डर पेस क्रमवारी गुणांसाठी चॅलेंजर स्पर्धामध्ये खेळत आहे. या स्पर्धामध्ये दमदार कामगिरीसह पेसने चार स्थानांनी सुधारणा करत अव्वल ५० खेळाडूंत स्थान पटकावले आहे. पेसनंतरचा क्रमवारीतील भारतीय खेळाडू पुरव राजा असून, त्याने दोन स्थानांनी सुधारणा करत १०४वे स्थान गाठले.

Story img Loader