Rohit Sharma advises ICC on Shubman Gill’s wicket decision: ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघ खेळाच्या चौथ्या दिवशी ४४४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला होता, त्यावेळी शुबमन गिलच्या विकेटची सर्वाधिक चर्चा झाली होती. आता सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना कर्णधार रोहित शर्माने आयसीसीला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, त्यावेळी कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिलने सकारात्मक फलंदाजीला सुरुवात केली. दोघांनी झटपट धावसंख्या ४१ धावांपर्यंत नेली. दरम्यान, स्कॉट बोलँडचा एक चेंडू गिलच्या बॅटच्या काठाला लागून स्लिमध्ये गेला. जेव्हा कॅमेरून ग्रीनने त्याचा झेल घेतला तेव्हा झेल स्पष्ट नसल्याने थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली. रिप्ले पाहिल्यावर चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसत होते, पण तरीही अंपायरने गिलला आऊट दिले.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

रोहित शर्माने आयसीसीला दिला सल्ला –

या निर्णयाबाबत कर्णधार रोहित शर्माने लगेचच मैदानावरील पंचांसमोर निराशा व्यक्त केली होती. आता हा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “मला वाटतं की या विकेटसाठी तिसऱ्या पंचाने आपला निर्णय देण्यापूर्वी आणखी रिप्ले पाहायला हवे होते. त्यानी हा निर्णय घाईघाईने घेतला. आयपीएलमध्ये आमच्याकडे १० कॅमेरा अँगल असतात. पण आयसीसीसारखी स्पर्धेत आणि तेही अंतिम सामन्यात, याकडे अधिक चांगल्या अँगलने पाहायला हवे होते.”

हेही वाचा – IND vs AUS Final: डब्ल्यूटीसी फायनल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस, पराभवानंतर भारताला किती कोटी मिळाले? जाणून घ्या

आयपीएलच्या १६ व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या शुबमन गिलकडून या महत्त्वाच्या सामन्यात सर्व भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु गिलने सर्वांची निराशा केली. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने १३ धावा केल्या, तो दुसऱ्या डावात केवळ १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला दोन्ही डावात पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्कॉट बोलँडने केले.