भारताचा श्रीलंकेविरूद्ध तिसरा टी २० सामना शुक्रवारी पुण्यात होणार आहे. तीन टी २० मालिकेतील हा अंतिम सामना आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. याचदरम्यानचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nonsense… रवी शास्त्री ICC वर भडकले!

भारताचा टी २० उपकर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर विश्रांती न घेता रोहित शर्मा सतत खेळत होता. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या विश्रांतीच्या कालावधीत गुरुवारी रोहितने झकासपैकी ‘फॅमिली डिनर डेट’ एन्जॉय केली. त्यात महत्त्वाचे म्हणजे रोहित आणि त्याची पत्नी रितिका हिला साथ मिळाली ती कसोटी संघाचा उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांची…

Video : बाबोsss…… २४ तासांत झाल्या ३ हॅट्रटिक

अजिंक्य रहाणेने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रितिका, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका आणि तो स्वत: असे चौघेही दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अजिंक्य रहाणेने लिहिले आहे, “२०२० : रात्रीचे जेवण झकास झाले. जेवणाचा आस्वाद घेताना लेकीचे पालन-पोषण आणि पालकत्व याबाबत गप्पा रंगल्या.”

अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात कन्येला जन्म दिला. तर रोहित शर्मा आणि रितिका यांना २०१८ मध्ये कन्यारत्न प्राप्ती झाली. दोघांनी तिचा वाढदिवस मालदिवमध्ये साजरा केला. रोहित आणि अजिंक्य यांच्यासारखीच मैत्री रितिका आणि राधिका यांच्यातही आहे. त्याचा प्रत्यय अजिंक्यने पोस्ट केलेल्या फोटोतही आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma ajinkya rahane talk about their daughters parenting family dinner date vjb
First published on: 10-01-2020 at 14:54 IST