Rohit Sharma Argue With Umpire in IND vs NZ Bengaluru Test Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने वेळोवेळी व्यत्यय आणला आहे. सततच्या पावसाने सामन्याची दिशा बदलण्यातही भूमिका बजावली आहे. बंगळुरूमधील पावसामुळेच पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, इतकंच काय तर नाणेफेकही झाली नव्हती. आता सामन्याच्या चौथ्या दिवशीही पावसाने टीम इंडियाची परीक्षा घेतली . खेळाच्या चौथ्या दिवशी दोन वेळा पावसामुळे सामना थांबवला गेला. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या शेवटी असं काही घडलं की ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडू नाराज झाले. इतकंच नव्हे तर रोहित आणि विराट पंचांशी वाद घालतानाही दिसला.

भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी ४६२ धावा केल्या. यासह भारताने न्यूझीलंड संघाला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडच्या डावालाही लगेच सुरूवात झाली. भारतीय संघ गोलंदाजीसाठी आला आणि रोहित शर्माने पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी टीम इंडियाला ब्रेकथ्रू मिळेल, अशी रोहित शर्मासह सर्वांचीच इच्छा होती. बुमराहही भेदक गोलंदाजी करत होता. पण विकेट पडण्याआधीच पंचांच्या इशाऱ्यामुळे किवी फलंदाज अचानक पॅव्हेलियनच्या दिशेने निघाले.

Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
KL Rahul and Kane Williamson Both Survives on No Ball After Getting Out in IND vs AUS & ENG vs NZ Test
नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO
IND vs AUS Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?
Harry Brook 8th Test Century Broke Don Bradman Record in NZ vs ENG Wellington
Harry Brook Century: हॅरी ब्रूकची शतकाची परंपरा कायम, डॉन ब्रॅडमन यांचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

Rohit Sharma Angry on Umpires in IND vs NZ Bengaluru Test
रोहित शर्मा आणि पंचांमध्ये वाद

IND vs NZ: रोहित शर्मा पंचांवर का भडकला?

सामन्याच्या चौथ्या डावातील पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहने फक्त चार चेंडू टाकले होते. तितक्यात पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला. लाईट मीटरने प्रकाश तपासल्यानंतर पंचांनी सामना थांबवण्याचे जाहीर केले. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता. रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचे इतर खेळाडूही नाराज दिसले. अजून प्रकाश आहे आणि सामना खेळवता येईल किंवा एक षटक तरी पूर्ण करावे, असं रोहित पंचांना सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवत होते.

हेह वाचा – IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी गमावली तर काय होणार? कसं असणार WTC फायनलचं समीकरण?

रोहित शर्मा पंचांना समजावत होता पण तोपर्यंत किवी फलंदाज कॉन्वे आणि लॅथम मैदानाबाहेर गेले होते. शेवटी भारतीय संघालाही माघारी जावे लागले आणि सामना थांबवण्यात आला. यामुळे टीम इंडिया खूपच संतप्त दिसत होती. रोहित शर्माच्या चेहऱ्यावर तर राग स्पष्ट दिसत होता आणि त्यानंतर रोहितबरोबर विराट कोहलीही पंचांशी बोलताना दिसला. पण याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही वेळाने पावसानेही हजेरी लावली आणि मग चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

Story img Loader