Rohit Sharma New Car: भारतीय संघातील स्टार फलंदाज मैदानावर आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर त्याच्या हटके स्टाईलसाठी. फिटनेसमुळे ट्रोल होणाऱ्या रोहितने आपल्या फिटनेसवर अधिक जोर दिला आणि तब्बल १० किलो वजन कमी केलं आहे. नुकताच त्याने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो हटके लुकमध्ये दिसून आला. दरम्यान तो आणखी एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. रोहितने आणखी एख नवीकोरी कार खरेदी केली आहे. त्याचा या कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान रोहित कार घेतली आणि कारची किंमत किती? जाणून घ्या.
रोहित शर्माने खरेदी केली नवी कार
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागला आहे, ज्यात भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा Tesla Model Y ही कार चालवताना दिसून येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रोहितने नुकताच ही कार खरेदी केली आहे. रोहितचा हा व्हिडीओ Rushiii_12 या एक्स एकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला नवी कार घेतल्यामुळे शुभेच्छा देताना दिसून येत आहे.
रोहितसाठी ही कार खास का आहे?
रोहितने Tesla model ही कार खरेदी केली आहे. या कारचा नंबर खूप खास आहे. कारण रोहितने या कारचा नंबर ३०१५ असा घेतला आहे. ही रोहितच्या दोन्ही मुलांची जन्मतारीख आहे. याआधी घेतलेल्या कारचा नंबर देखील त्याने आपल्या मुलांच्या जन्मतारखेवरून ठेवला होता. यावेळेही त्याने असंच काहीसं केलं आहे.
कारचं नाव काय? आणि रोहितने केव्हा खरेदी केली?
माध्यमातील वृत्तानुसार, रोहितने टेस्ला कंपनीची वाय रियर व्हिल ड्राईव्ह रेंज वेरियंटची कार खरेदी केली आहे. ही कार त्याने काही दिवसांपूर्वीच खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. ही कार एका चार्जमध्ये ५०० ते ६२२ किलोमीटर चालू शकते. या कारच्या किमतीबद्दल बोलायचं झालं, तर ही भारतात या कारची किंमत ५९.८९ लाख रूपये इतकी आहे. तर या कारचा टॉप मॉडेल ६७.८९ लाख रुपयांना आहे.