Rohit Sharma’s New Record: टीम इंडियाने रविवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा टीम इंडियाला अभिमान आहे आणि विशेषतः कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात कर्णधार रोहितनेही आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला –

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सलग ४ कसोटी सामने जिंकणारा जगातील तिसरा कर्णधार ठरला आहे. त्याने या बाबतीत माजी कर्णधार एमएस धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची बरोबरी केली. धोनी आणि बाबर यांच्यासोबत गेल्या ५० वर्षांत सलग ४ कसोटी जिंकणारा रोहित कर्णधार ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकण्यापूर्वी टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली होती.

मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेला भारत दौऱ्यावर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाने पहिली कसोटी २३८ धावांनी आणि दुसरी २२२ धावांनी जिंकली. अशाप्रकारे रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली सलग चार कसोटी सामने जिंकून क्रिकेट इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी सिराज-किशनचा नवीन लूक व्हायरल; एकदा पाहाच स्टायलिश हेअरकटमधील फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डब्ल्यूटीसी अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित –

मात्र, या विजयानंतर एकीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमधील टीम इंडियाचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी धोका वाढला आहे. १ मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.