scorecardresearch

Premium

IND vs BAN: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आशिया कपमध्ये ‘हा’ नकोसा कारनामा करणारा ठरला पहिला भारतीय

Rohit Sharma’s Embarrassing Record: बांगलादेशच्या २६५ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माला तनझिम हसन साकिबने बाद केले.

Rohit Sharma's Embarrassing Record
रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद (फोटो-ट्विटर)

Rohit Sharma first Indian player to be out on zero 3 times in Asia Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया चषक सुपर फोर फेरीचा शेवटचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये समोरासमोर आले आहेत. बांगलादेशच्या २६५ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माला तनझिम हसन साकिबने बाद केले. यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, आशिया कपच्या इतिहासात रोहित शर्मा तिसऱ्यांदा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –

आशिया चषकाच्या इतिहासात तीनदा शून्यावर बाद होणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. याशिवाय रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात दोनदा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. तसेच रोहित शर्माच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, आशिया कपच्या इतिहासात रोहित शर्मा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी आशिया कप १९८८ मध्ये दिलीप वेंगसाकर कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाले होते.

IND vs ENG 4th Test Match Result Updates in marathi
IND vs ENG : भारताच्या युवाशक्तीचा विजय; चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली
Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”
Video of Rohit's catch In IND vs ENG 2nd Test Match
IND vs ENG : अश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने घेतला पोपचा उत्कृष्ट झेल, फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

हेही वाचा – World Cup 2023: धोनी आणि इस्रो प्रमुखांसाठी सुनील गावसरांची बीसीसीआयकडे अनोखी मागणी; म्हणाले, ‘सचिन आणि अमिताभप्रमाणे…’

टीम इंडियासमोर २६६ धावांचं लक्ष्य –

भारत-बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियासमोर विजयासाठी २६६ धावांचे लक्ष्य आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने ५० षटकांत ८ गडी गमावून २६५ धावा केल्या. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशसाठी कर्णधार शाकीब अल हसन आणि तौहीद हृदय यांनी ५० धावांचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माने रचला इतिहास, भारताकडून ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

भारताकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ बळी घेतले. बांगलादेशच्या २६५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने वृत्त लिहिपर्यंत २७ षटकांत ४ बाद १३३ धावा केल्या आहेत. सध्या शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन आणि तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma is the first indian player to be out on zero 3 times in asia cup history in ind vs ban match vbm

First published on: 15-09-2023 at 21:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×