Rohit Sharma is the fifth player from India to take 200 catches: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध मेहंदी हसन मिराजचा अप्रतिम झेल घेतला. रोहित शर्माचा हा झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने एका खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वास्तविक, रोहित शर्मा भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा पाचव्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा २०० झेल घेणारा भारताचा ठरला पाचवा खेळाडू –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० झेलांचा आकडा गाठणाऱ्या भारताच्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या आधी हा विक्रम राहुल द्रविड, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांनी केला आहे. आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यात रोहित शर्माने बांगलादेशचा फलंदाज मेहंदी हसन मिराजचा झेल घेताच हा पराक्रम केला. याशिवाय भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४४९व्या सामन्यात हा पराक्रम केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने खूप पूर्वी झेलांचे त्रिशतक पूर्ण केले होते. त्याने भारताकडून आतापर्यंत ५०५ सामन्यांमध्ये ३०३ झेल घेतले आहेत. या बाबतीत भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ४३३ सामन्यांमध्ये २६१ झेल घेतले, तर माजी फलंदाज सचिन तेंडुलकर ६६४ सामन्यांमध्ये २५६ झेल घेऊन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तसेच सुरेश रैनाने ३२२ सामन्यांमध्ये १६७ झेल घेतले. तो सहाव्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविड ३३४ झेलांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – SA vs AUS: विश्वचषक २०२३ पूर्वी दक्षिण आफ्रिकेला बसले दोन मोठे धक्के, कर्णधारासह ‘या’ स्टार गोलंदाजाला झाली दुखापत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेतलेले खेळाडू –

राहुल द्रविड – ५०९ सामने – ३३४ झेल
विराट कोहली – ५०५ सामने – ३०३ झेल
मो. अझरुदिन- ४३३ सामने – २६१ झेल
सचिन तेंडुलकर – ६६४ सामने – २५६ झेल
रोहित शर्मा – ४४९ सामने – २०० झेल
सुरेश रैना – ३२२ सामने – १६७ झेल

हेही वाचा – IND vs BAN: रवींद्र जडेजाचा आणखी एक मोठा पराक्रम, कपिल देव नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

सक्रिय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले सर्वाधिक झेल –

विराट कोहली- ३०३
स्टीव्ह स्मिथ – २८८
जो रूट- २८०
डेव्हिड वॉर्नर – २०३
रोहित शर्मा – २००
केन विल्यमसन – १८७

Story img Loader