स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा टी-२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

“धक्कादायक!! पण भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी शुभेच्छा,” असं रोहितने कोहलीसोबतचा एक फोटो टाकून त्याला कॅप्शन दिलंय.

मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट टी-२० संघाचे कप्तानपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने विराटला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवले. रोहित शर्माला टी-२० आणि वनडे संघाची कमान सोपवण्यात आली.

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराटऐवजी केएल राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले. पण विराटची अनुपस्थिती भारताला महागात पडली आणि त्यांनी हा सामना गमावला. आता विराटनंतर कोणाकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची कमान सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शेवटी धोनीचे खूप आभार, ज्यानं…”, टेस्ट कॅप्टनशिप सोडणाऱ्या विराटनं पोस्टमध्ये केला ‘कॅप्टन कूल’चा उल्लेख!