Rohit Sharma running video : रोहित शर्मा गेल्या काही कालावधीपासून खराब फॉर्ममधून जात आहे. जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वजण भारतीय कर्णधाराचे कौतुक करत होते, परंतु काही महिन्यांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेतलेल्या रोहितवर कसोटीतूनही निवृत्ती घेण्याचा दबाव येऊ लागला आहे. अशात रोहितने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचा फिटनेसवर काम करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रोहितच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे भारतीय कर्णधार त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून रोहित स्वतःला फिट ठेवायचे आहे. दरम्यान, रोहित शर्मा मुंबईच्या बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये धावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताचा माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धूनेही रोहितला फिटनेसवर काम करण्यास सांगितले होते.

रोहित शर्माचा धावातानाचा व्हिडीओ –

२३ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अगोदर खराब टप्प्याशी झुंजत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी मुंबई संघासोबत सराव केला. मात्र तो आगामी सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३७ वर्षीय रोहित फारच खराब फॉर्ममध्ये होता. त्याने ऑस्ट्रेलियातील तीन कसोटींमध्ये केवळ ३१ धावा केल्या आणि सिडनीतील पाचव्या आणि अंतिम कसोटीतून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे स्टेडियमवर सकाळी काही तास चाललेल्या सराव सत्रात त्याने भाग घेतला. त्याने अजिंक्य रहाणेसोबत फलंदाजी केली. रोहित मुंबईकडून शेवटचा सामना २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब फॉर्ममुळे रोहितने सिडनी कसोटीतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि शेवटचा सामना खेळला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त होऊ शकतो, असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. मात्र, रोहितने या सर्व दाव्यांचे खंडन केले.