Rohit Sharma Viral Video: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. रोहितने कसोटी आणि टी -२० क्री क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान गणेशोत्सवात त्याने वरळीतील मुंबई पोलिसांचा राजा या गणपती मंडळाला भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यादरम्यान त्याने हात जोडून चाहत्यांना शांत राहण्याची विनंती केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. अलीकडेच त्याने वरळीतील मुंबई पोलिसांचा राजा या गणपती मंडळाला भेट दिली. यादरम्यान रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. रोहित आल्यानंतर मुंबईचा राजा रोहित शर्मा ही घोषणा होणार नाही, असं होऊच शकत नाही. रोहित शर्मा मैदानावर असताना जोरदार घोषणा दिल्या जातात. पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना या घोषणा दिलेलं रोहित शर्माला आवडलं नाही. त्यामुळे त्याने चाहत्यांना हात जोडून घोषणा देऊ नका अशी विनंती केली. चाहत्यांनीही रोहितच्या विनंतीला मान देऊन घोषणा देणं थांबवलं.

फिटनेस टेस्टमध्ये रोहित पास

अलीकडेच बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये भारतीय खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. ज्यात रोहित शर्माचा देखील समावेश होता. ही फिटनेस टेस्ट रोहित शर्माने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. गेल्या काही दिवसांत त्याने वजन कमी करण्यावर अधिक भर दिला. आता त्याने वजन कमी करून फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की, तो आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी तयार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उतरणार मैदानात?

रोहित शर्माने कसोटी आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. भारतीय संघ आता थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा मैदानावर पुजारागमन करू शकतो. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वनडे आणि ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.व