टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा एका नव्या लूकमध्ये दिसला. रोहित शर्माने (rohit sharma new look) त्याचा दाढी नसलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहितच्या या नव्या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. रोहितचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेतून (IND vs SA) बाहेर पडला तो आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएसमध्ये तयारी सुरू केली.

हेही वाचा – PCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा प्रियांक पांचाळला रोहितऐवजी संघात स्थान देण्यात आले.