आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ट्विटर अकाउंट आज, शनिवार, (२१ जानेवारी) हॅक झाले आहे. हॅकर्सनी आरसीबी ट्विट्सऐवजी फ्रेंचाइजी बोरड एपे यॉट क्लब असे नाव दिले आणि आरसीबीच्या ट्विटर अकाउंटवर एनएफटीशी (नॉन-फंजिबल टोकन) संबंधित पोस्ट शेअर केली होती. तसेच, फ्रँचायझीला त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकाउंट हॅक होण्यापूर्वी फ्रँचायझीने रायपूर येथे होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्याशी संबंधित काही पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, त्यानंतर हॅकर्सनी आरसीबीच्या ट्विटर अकाउंटचा लोगो आणि कव्हर फोटोही बदलला होता.

ही माहिती देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एका निवेदनात म्हटले आहे की, ”आमची लाडकी १२ वी मॅन आर्मी, आमचे ट्विटर अकाउंट ज्याच्यासोबत काही तासांपूर्वी छेडछाड करण्यात आली होती. आता आम्ही ते परत मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. हॅकर्सनी पोस्ट केलेल्या ट्विटचा आम्ही निषेध करतो. तसेच आम्ही हॅकर्स केलेल्या पोस्टचे समर्थन करत नाही. या दरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.”

आयपीएल २०२३ साठी, संघाने आपल्या संघात काही धडाकेबाज खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यापैकी विल जॅकला ३.२ कोटींना आणि इंग्लंडच्या रीस टोपलीला १.९ कोटींना विकत घेऊन आरसीबीने आपली गोलंदाजी मजबूत केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्माकडे गेल-आफ्रिदीच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी; करावे लागेल फक्त ‘हे’ काम

आरसीबीने आयपीएलच्या १५ हंगामात एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली असली, तरी एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challengers bangalore official twitter account hacked see what the hackers did vbm
First published on: 21-01-2023 at 14:26 IST