भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्किया कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. नॉर्किया दुखापतींशी झुंज देत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ट्वीट करून ही माहिती दिली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दुखापतीमुळे नॉर्किया ​​तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

नॉर्किया मालिकेबाहेर झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीला मोठा फटका बसणार आहे. तो काही काळ संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या बरोबरीने तो प्रोटीज संघाच्या वेगवान आक्रमणाला धार लावत असे. नॉर्कियामध्ये १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू सातत्याने टाकण्याची क्षमता आहे. त्याने आतापर्यंत देशासाठी १२ कसोटी, १२ एकदिवसीय आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत.

हेही वाचा – मोहम्मद कैफ पुन्हा लढवणार निवडणूक? इन्स्टाग्राम पोस्टमधील ‘त्या’ शब्दावरून नेटकऱ्यांनी केला सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये नॉर्किया चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने यावर्षी पाच कसोटी सामन्यांमध्ये २५ विकेट घेतल्या. त्याने २०१९ मध्ये भारताविरुद्धच्या पुणे कसोटीतून पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेत भारताविरुद्ध त्याने अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही. नॉर्कियाने नुकतीच आयपीएल २०२१ स्पर्धा खेळली. तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. या संघासाठी त्याने अप्रतिम कामगिरी केली. यामुळे दिल्लीने त्याला आयपीएल २०२२ पूर्वी रिटेन केले आहे.