Sachin Tendulkar latest News : बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टीवरून तर्क वितर्क लावण्यात आले. गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असल्याने काही सामने तीन दिवसात निकाली लागले, अशी चर्चा क्रिकेटविश्वात रंगली होती. पण भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने कसोटी मालिका खेळवण्यात येणाऱ्या खेळपट्ट्यांबाबत सूचक विधान केलं आहे. कसोटी क्रिकेटचं आकर्षण कायम ठेवण्यासाठी सामना किती दिवस चालला यापेक्षा तो सामना किती रोमांचक होता, हे पाहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत क्रिकेट खेळणं, हेच महत्वाचं असतं, अशाप्रकारे सूचन वक्तव्य करत सचिनने खेळपट्टीबाबत वेगवेगळी विधानं करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

सचिनने ‘आजतक’शी बोलताना म्हटलं की, आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आवश्यकता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आकर्षण असलं पाहिजे आणि सामना किती दिवसात संपला, याकडे जास्त लक्ष केंद्रीत करु नये. आम्ही क्रिकेटर वेगवेगळ्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी बनलो आहोत. जरी खेळपट्टी वेगवेवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी अनुकूल असली, अशा परिस्थितीतही आम्हाला प्रत्येक चेंडूचा सामना करता आला पाहिजे.

नक्की वाचा – हार्दिक पांड्याचं राहुलबाबत मोठं विधान, म्हणाला, “खराब फॉर्ममुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात…”

आयसीसी, मेरीलेबोन क्रिकेट क्लब आणि अन्य क्रिकेट संस्था कसोटी क्रिकेटला मनोरंजनाच्या रुपात बघत आहेत. तीन दिवसांत समाप्त होणाऱ्या सामन्यांमध्ये कोणत्याच प्रकारचं नुकसान नाहीय. जेव्हा तुम्ही दौरा करता त्यावेळी परिस्थिती सोपी नसते. काय होत आहे, हे समजण्याची तुम्हाला गरज असते. प्रत्येक गोष्टीचं आकलन आणि नवीन योजना आखल्या पाहिजेत, असंही सचिनने म्हटलं.

सचिन पुढं बोलताना म्हणाला, आयसीसी, एमसीसी यांच्यासोबत आम्ही सर्व कसोटी क्रिकेटबद्दल बोलत असतो. कसोटी क्रिकेटला अधिक महत्व कसं प्राप्त होईल, याचाही प्रयत्न असतो. जर आपल्याया अशा गोष्टी पाहिजे असतील, तर गोलंदाजांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. कारण गोलंदाज प्रत्येक चेंडूवर एक प्रश्न विचारतो आणि फलंदाजाला त्याचं उत्तर द्यावं लागतं.