टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या महागड्या गोलंदाजीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभूत केले. शिवाय त्यांनी १० गड्यांनी भारताला धूळ चारली. भारतीय गोलंदाजांना सामन्यात अपयश आल्यानंतर शमीला सोशल मीडियालर शिवीगाळ करण्यात आली. देशातील अनेक महान खेळाडू शमीच्या बचावासाठी पुढे आले आणि आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही शमीसाठी एक ट्वीट केले आहे.

सचिनने ट्वीट करून शमीला पाठिंबा दिला. तो म्हणाला, ”जेव्हा आपण टीम इंडियाचे समर्थन करतो, तेव्हा आपण टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समर्थन करतो. मोहम्मद शमी एक समर्पित आणि जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि रविवार हा त्याचा दिवस नव्हता, असे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकते. मी शमी आणि टीम इंडियाच्या पाठीशी आहे.”

हेही वाचा – IPL : लखनऊसाठी मोजले ७००० कोटी; CSK, MI ची किंमत माहितीय का?

सचिन तेंडुलकरच्या आधी माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही मोहम्मद शमीचा बचाव केला. सोशल मीडिया ट्रोलर्सना फटकारताना सेहवाग आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, “मोहम्मद शमीवर झालेला ऑनलाइन हल्ला धक्कादायक आहे, आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. तो चॅम्पियन आहे आणि जो भारताची टोपी घालतो, त्याच्यामध्ये देश जास्त राहतो, शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखव”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद शमी हा अलीकडच्या काळातील भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असून त्याने गेल्या पाच वर्षात चांगली कामगिरी केली आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या कामगिरीला धर्माशी जोडले. शमीने पाकिस्तानविरुद्ध ३.५ षटकात ४३ धावा दिल्या.