सध्याचं युग हे चॅलेंजचं युग आहे. हल्ली सतत एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही ना काही चॅलेंज देत असतो. सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटपटू, अभिनेते असोत किंवा अभिनेत्री… सारेच कोणते ना कोणते चॅलेंज देत असतात. त्यात आज थेट भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपला मित्र विनोद कांबळी याला एक चॅलेंज दिले आहे. तसेच हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्याला आठवड्याभराचा कालावधी दिला आहे.

भारताला जबर धक्का; ‘इन-फॉर्म’ फलंदाज न्यूझीलंड दौऱ्यातून OUT

काय आहे हे चॅलेंज…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणं तयार केलं होतं. ‘क्रिकेटवाली बीट पे’ असं हे गाणं होतं. हे गाणं सचिनच्या कारकिर्दीवर आधारित होतं. या गाण्यामध्ये सचिन कोणा-कोणाबरोबर क्रिकेट खेळला आहे, हे दाखवण्यात आले होते. त्याचबरोबर सचिनने कशाप्रकारचे फटके मारले. त्याला स्टेडियममध्ये कसा प्रतिसाद मिळाला हेदेखील दाखवण्यात आले आहे. हे गाणं सोनू निगमबरोबर सचिननेही गायले आहे.

U-19 World Cup 2020 : भारत अवघ्या २९ चेंडूत ‘यशस्वी’; उडवला जपानचा धुव्वा

U-19 WC 2020 : भारताविरूद्ध जपानचं स्कोअरकार्ड; १,७,०,०,०,०,०,७,५,१…

दरम्यान, सचिन-सोनुच्या या गाण्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. हे गाणं रॅप पद्धतीने गाण्याचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिलं आहे. यासाठी सचिनने कांबळीला आठवड्याभराची मुदत दिली आहे. या आठवड्याभरात जर कांबळीने हे गाणे व्यवस्थित गायले, तर त्याला सचिन हवं ते द्यायला तयार आहे, असंही सचिनने स्पष्ट केलं आहे.

विराट कोहली की स्टीव्ह स्मिथ.. सर्वोत्तम कोण? आकडेवारी पाहून तुम्हीच ठरवा

सचिननं दिलेलं हे चॅलेंज कांबळीने स्वीकारलं आहेच. त्याच्याकडे आता २८ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. ते चॅलेंज विनोद कांबळी पूर्ण करणार का ते पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.