Sachin Tendulkar and Brain Lara on London Street: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सचिन आपले प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. सध्या ‘मास्टर ब्लास्टर सचिन’ कुटुंबासह परदेशात सुट्टी घालवत आहे. दरम्यान, लंडनमध्ये, त्याने त्याचा जुना मित्र आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ब्रायन लारासोबत खास भेट घेतली, ज्याचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले.

क्रिकेट जगतातील दोन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा पुन्हा एकदा लंडनच्या रस्त्यांवर एकत्र फिरताना दिसले. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर ब्रायन लारासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने हे दोघेही गोल्फचे वेड असल्याचे सांगितले आहे. सचिन सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांपूर्वी तो तेथे गोल्फ खेळताना दिसला होता. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

खरं तर, बुधवारी, २८ जून रोजी सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन छायाचित्रे शेअर केली ज्यामध्ये तो कॅरेबियन दिग्गज ब्रायन लारासोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यादरम्यान दोघेही मस्त स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले, “आज आणखी एका उत्तुंग गोल्फपटूला भेटलो.”

सचिनची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली असून चाहते कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, “आजूबाजूच्या गर्दीला हे देखील माहित नाही की क्रिकेट जगतातील दोन सर्वोत्तम फलंदाज त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत.”

हेही वाचा: Virat Kohli: विराट इंग्लंडमध्ये नेमकं काय करतोय? किंग कोहलीचे लंडनच्या रस्त्यांवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे सचिन आणि लारा दोघांनाही गोल्फ खेळण्याचे वेड आहे. अनेकदा दोन्ही दिग्गज खेळाडू संधी मिळताच गोल्फ खेळण्यासाठी पोहोचतात. अलीकडेच सचिनने केनियामध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोल्फर गॅरी प्लेयरची भेट घेतली आणि त्याच्याकडून काही टिप्स घेतल्या. दुसरीकडे, जर आपण क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २४ वर्षांची होती, दुसरीकडे लाराने १७ वर्षे वेस्ट इंडिज संघाला आपली सेवा दिली. आपल्या कारकिर्दीत या दोन्ही दिग्गजांनी अनेक विक्रम केले जे आजही कायम आहेत. आयपीएलदरम्यानही लारा जेव्हा भारतात येतो तेव्हा तो सचिनला नक्कीच भेटतो.