मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटमधील ‘दादा’ सौरव गांगुली आता फुटबॉलच्या मैदानात उतरले असून इंडियन सुपर लीगमधील संघांची मालकी या खेळाडूंनी मिळवली आहे. सचिनने कोची संघ विकत घेतला असून गांगुलीने त्याच्या घरचा म्हणजे कोलकाता संघासाठी यशस्वी बोली लावली. सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत कोची संघाचे हक्क मिळवले. याउलट गांगुलीने स्पेनमधील आघाडीचा क्लब अॅटलेटिको माद्रिद, हर्षवर्धन नोटिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख या व्यावसायिकांसोबत संयुक्तपणे कोलकाता संघाचे मालकी हक्क मिळवले.
मुंबई संघाची मालकी मिळवण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यश आले. त्याने बिमल पारेखसोबत मुंबई संघ विकत घेतला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पुण्याचा संघ विकत घेण्यात यशस्वी झाला. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान ग्रुपसोबत सलमानने ही यशस्वी बोली लावली. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आय-लीग संघ शिलॉँग लॅजॉँगसोबत गुवाहाटी संघ खरेदी केला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
तेंडुलकर, गांगुली फुटबॉल संघांचे मालक
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटमधील 'दादा' सौरव गांगुली आता फुटबॉलच्या मैदानात उतरले असून इंडियन सुपर लीगमधील संघांची मालकी या खेळाडूंनी मिळवली आहे.
First published on: 13-04-2014 at 05:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar sourav ganguly foray into football win isl bids