भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या दुसऱ्या हंगामात खेळणार नाही. सचिन या स्पर्धेत न खेळण्याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहभागी झालेल्या अनेक क्रिकेटपटूंना पैसे दिले नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे सचिननेही यंदा या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सचिन इंडिया लेजेंड्स संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपदही पटकावले होते.

पीटीआयशी बोलताना, संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, ”सचिन तेंडुलकर या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा भाग असणार नाही. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये १ ते १९ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे, मात्र सचिन या स्पर्धेत खेळणार नाही. सचिन अशा अनेक क्रिकेटपटूंपैकी एक होता, ज्यांना आयोजकांनी पैसे दिले नाहीत. काही माहिती मागवायची असल्यास, मुख्य आयोजक रवी गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा.”

हेही वाचा – Legends League Cricket : टीम इंडियाला मोठा धक्का; कॅप्टन वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन सामन्यातून OUT!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली, ज्यामध्ये निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेतात. बहुतेक खेळाडूंनी मॅजेस्टिक लेजेंड्स प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला होता. कराराच्या वेळी खेळाडूंना दहा टक्के रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर चाळीस टक्के रक्कम फेब्रुवारी २०२१ मध्ये आणि उर्वरित रक्कम मार्च २०२१ मध्ये द्यायची होती.