नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळाच्या मैदानावरील स्पर्धा क्रिकेट, हॉकीपाठोपाठ फुटबॉलमध्येही दिसणार आहे. तब्बल पाच वर्षांनी भारत आणि पाकिस्तान फुटबॉल संघ ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. भारतात २१ जून ते ४ जुलैदरम्यान ही स्पर्धा बंगळूरुत होणार असून, भारत व पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका एका खास सोहळय़ात जाहीर करण्यात आली. गतविजेत्या भारतासह, पाकिस्तान, कुवेत, नेपाळ संघ ‘अ’ गटात असून लेबेनॉन, मालदिव, बांगलादेश, भूतान संघांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. गटातील सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार असून, गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. स्पर्धेत प्रथमच लेबेनॉन आणि कुवेत या दोन बाहेरच्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत ‘फिफा’ क्रमवारीत सर्वात वरचे ९९वे स्थान असलेला लेबेनॉन हा संघ असून, सर्वात खालचे १९५वे स्थान असलेला पाकिस्तान संघ आहे. भारताचे १०१वे स्थान आहे.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान २१ जून रोजी सामना होणार आहे. त्यापूर्वी कुवेत विरुद्ध नेपाळ हा उद्घाटनाचा सामना होईल. यापूर्वी २०१८मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तानदरम्यान अखेरचा सामना झाला होता. भारताने तो सामना ३-१ असा जिंकला होता. आतापर्यंत या दोन पारंपरिक संघांदरम्यान २० सामने झाले असून, भारताने १२ सामने जिंकले आहेत.

पाकिस्तान संघाने भारतात येण्यासाठी यापूर्वी ‘व्हिसा’साठी अर्ज केला असून, त्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे.‘‘‘व्हिसा’ मंजूर करणे हे कुठल्याही क्रीडा महासंघाच्या अखत्यारीत येत नाही. क्रीडा संघटना केवळ या प्रक्रियेत समन्वय साधतात. आम्ही संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधला असून, लवकरच आम्हाला उत्तर मिळेल,’’ असे भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव शाजी प्रभाकरन यांनी सांगितले.

असे होतील सामने

२१ जून : कुवेत वि. नेपाळ  दु. ३.३० वा., भारत वि. पाकिस्तान ७.३० वा.

२२ जून : लेबेनॉन वि. बांगलादेश दु. ३.३० वा., मालदिव वि. भूतान ७.३० वा.

२४ जून : पाकिस्तान वि. कुवेत ३.३० वा., नेपाळ वि.भारत ७.३० वा.

२५ जून : बांगलादेश वि. मालदिव दु. ३.३० वा. भूतान वि. लेबेनॉन ७.३० वा.

२७ जून : नेपाळ वि. पाकिस्तान दु. ३.३० वा. भारत वि. कुवेत ७.३० वा.

२८ जून : लेबेनॉन वि. मालदिव दु. ३.३० वा., भूतान वि. बांगलादेश ७.३० वा.

१ जुलै : उपांत्य फेरी ४ जुलै : अंतिम सामना