भारताची फुलराणी सायना नेहवालसह एच. एस. प्रणॉय, पी. व्ही. सिंधू यांनी न्यूझीलंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अव्वल मानांकित सायनाने क्रिस्तिना गॅव्हनहोल्टवर २१-१८, २१-१७ असा विजय मिळवला. सिंधूने तैपेईच्या पाई यु पो हिला २१-१६, २१-१६ असे नमवले. प्रणॉयने राजीव ओस्युफवर २१-१३, २१-१८ अशी मात केली. चोयू तिआन चेनने बी. साईप्रणीतचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. तांगसाओक सेइनबुनसुकने समीर वर्माला २१-१५, २१-१९ असे नमवले. दुहेरी प्रकारात तीन जोडय़ांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
भारताची फुलराणी सायना नेहवालसह एच. एस. प्रणॉय, पी. व्ही. सिंधू यांनी न्यूझीलंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-03-2016 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal p v sindhu