भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीतून सावरत असून, पुढील आठवडय़ात ती बंगळुरूला सरावाला पुन्हा सुरुवात करणार आहे, अशी माहिती तिचे वडील हरविर सिंग यांनी दिली. ‘‘सध्या हैदराबादमध्ये सायनाच्या पायाच्या घोटाला झालेल्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. चिंता करण्यासारखी दुखापत नसून, ती यातून बऱ्यापैकी सावरते आहे. पुढील आठवडय़ात बंगळुरूला ती पुन्हा सरावाला प्रारंभ करील,’’ असे हरविर सिंग यांनी सांगितले. गेल्या महिन्यात सायनाला झालेल्या दुखापतीमुळे तिला हाँगकाँग खुल्या स्पध्रेतून माघार घ्यावी लागली. याचप्रमाणे जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर सीरिज फायनल्स स्पध्रेतील तिच्या कामगिरीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2015 रोजी प्रकाशित
पुढील आठवडय़ात बंगळुरूला सायनाचा सरावाला प्रारंभ
गेल्या महिन्यात सायनाला झालेल्या दुखापतीमुळे तिला हाँगकाँग खुल्या स्पध्रेतून माघार घ्यावी लागली.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 19-12-2015 at 05:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal start practice in bangalore