मलेशिया येथे पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई हॉकी चषकासाठी भारताचा ४८ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला असून, त्यामधून ‘ड्रगफ्लिकर’ संदीप सिंगला डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संभाव्य संघाचे शिबीर १६ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत बंगळुरूमध्ये भरणार आहे. सध्याच्या वाईट फॉर्ममुळे त्याला संघातून काढून टाकल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे.
भारताचा संभाव्य संघ
गोलरक्षक : पी.आर. श्रीजेश, पी.टी. राव, श्रीनिवास राव काथरू, जगदीप दयाल, अभिनय कुमार पांडे.
बचावपटू : व्ही.आर. रघुनाथ, रुपिंदर पाल सिंग, हरबीर सिंग संधू, अमित रोहिदास, संपत कुमार मयलाराम, गगनदीप सिंग, दयानंद चनमथाबम, नरिंदर पाल सिंग, गुरमेल सिंग.
मध्यरक्षक : सरदार सिंग, मनप्रीत सिंग, एम. बी. अयप्पा, कोथाजित सिंग, परदीप मोर, विवेक धर, बीरेंद्र लाक्रा, जयप्रीत सिंग, समिरनजीत सिंग, मनजीत कुल्लू, विकास पिल्ले, सुमित.
आघाडीपटू : एस.व्ही. सुनील, गुरविंदर सिंग चंडी, चिंनग्लेन्सना सिंग, दानिश मुजताबा, एस. के. उथप्पा, प्रधान सोमण्णा, नितीन थिमाइया, धरमवीर सिंग, आकाशदीप सिंग, एम.जी. पोन्चा, प्रभदीप सिंग, पी.एल. थिमन्ना, गुरप्रीत सिंग, जसजीत सिंग, निकीन थिमाइया, सुखदेव सिंग, हरमनप्रीत सिंग, मनजिंदर सिंग, के. मुडाप्पा, गगनजीत सिंग.