भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाने महिलांच्या दुहेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तिने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्सच्या साथीने एपिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद मिळवल्याने तिला ४७० मानांकन गुणांची कमाई झाली. तिने गतवर्षी जुलैतही पाचवे स्थान घेतले होते. याबाबत सानिया म्हणाली, ‘‘पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविणे ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आगामी मोसमात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मला प्रेरणा मिळणार आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2015 रोजी प्रकाशित
जागतिक क्रमवारीत सानियाची पाचव्या स्थानावर झेप
भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाने महिलांच्या दुहेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
First published on: 19-01-2015 at 02:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania equals career best fifth rank in world