भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सहाव्या मानांकित सानिया-ब्लॅक जोडीवर इटलीच्या सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सी या जोडीने २-६, ६-३, ४-६ अशी मात केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सानिया-ब्लॅक यांनी एका क्षणी ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण मिळालेल्या संधीचे सोने करता न आल्यामुळे सानिया-ब्लॅक जोडीला एक तास ४८ मिनिटे रंगलेल्या या मुकाबल्यात हार पत्करावी लागली. सानिया-ब्लॅक जोडीने २४ दुहेरी चुका केल्यामुळे त्यांना विजयाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. दरम्यान, कनिष्ठ मुलींच्या गटात स्नेहादेवी रेड्डी आणि ध्रुती वेणुगोपाल यांना दुहेरीच्या लढतीत अव्वल मानांकित युक्रेनची अन्हेलिना कॅलिनिना आणि रशियाची इलिझावेटा कुलिचकोव्हा यांच्याकडून १-६, २-६ असे पराभूत व्हावे लागले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : महिला दुहेरीत सानिया पराभूत
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
First published on: 22-01-2014 at 05:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza loses in qf of australian open