भारताच्या सानिया मिर्झाने स्विसची अव्वल दर्जाची खेळाडू मार्टिना िहगीस हिच्या साथीत खेळण्याचा प्रारंभ विजेतेपदाने केला. या जोडीने बीएनपी पारिबस खुली टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी एकतेरिना माकारोवा व एलिना वेसनिना यांच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली.
पहिल्या सेटमध्ये सानिया व हिंगीस यांनी पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये २-४ अशा पिछाडीवरून त्यांनी संघर्षपूर्ण खेळ करीत विजयश्री संपादन केली.