इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथित सहभाग असलेल्या खेळाडूंची नावे असलेला न्यायमूर्ती मुदगल समितीच्या अहवालाच्या बंद खलित्याविषयी माजी सरन्यायाधीश यांच्या नेतृत्त्वाखालील लोढा समितीच निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कामकाजात प्रशासकीय सुधारणेच्या दृष्टीने लोढा समितीने उपाययोजना आखल्या आहेत. बंद खलित्यात नावे असलेल्या खेळाडूंची प्रतिमा लक्षात घेऊन यासंदर्भातला अंतिम निर्णयाची जबाबदारी लोढा समितीकडे असेल. बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. बंद खलित्यामध्ये बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासह काही खेळाडूंची नावे आहेत आणि या खलित्याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.