स्पॉट फिक्सिंगग्रस्त मागील आयपीएल मोसमाचा यावेळीच्या आयपीएलच्या प्रसिद्धीवर परिणाम होणार नाही. उलट प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या यांचे म्हणणे आहे.
विजय मल्ल्या म्हणतात, प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात. त्यामुळे त्या स्पर्धेच्या प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेवर कोणताही परिणाम होत नाही. जर आम्हाला आयपीएल बद्दल काही वाटत नसते तर, आज आम्ही येथे आलोच नसतो असेही मल्ल्या आज आयपीएल लिलावा दरम्यान म्हणाले. आयपीएलची प्रतिष्ठा आहे तशीच कायम आहे आणि राहील असेही मल्ल्या म्हणाले. तसेच घडलेले फिक्सिंग प्रकरण दुर्दैवी ठरले हे खरे आहे. पण, आयपीएलची प्रतिष्ठा अबाधित राहील असा विश्वासही मल्ल्या यांनी यावेळी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2014 रोजी प्रकाशित
प्रत्येक खेळात घोटाळे होतात- विजय मल्ल्या
स्पॉट फिक्सिंगग्रस्त मागील आयपीएल मोसमाचा यावेळीच्या आयपीएलच्या प्रसिद्धीवर परिणाम होणार नाही. उलट प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या यांचे म्हणणे आहे.
First published on: 12-02-2014 at 04:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scams happen in every sport mallya