भारताचा आक्रमक फलंदाज हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा हार्दिक IPL मधील जवळपास प्रत्येक सामन्यात गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने केवळ १६ चेंडून तीन षटकार व दोन चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या होत्या. हार्दिकच्या आक्रमक फलंदाजीमुळे अगामी विश्वचषक स्पर्धेत भारताची दावेदारी आणखीन प्रबळ झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. भारतासाठी हुकूमी एक्का ठरणाऱ्या हार्दिक विरुद्ध विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी करणे माझ्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे, असे मत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने व्यक्त केले आहे.
“I am scared to bowl to @hardikpandya7 at the World Cup.” – Lasith Malinga#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #MIvRCB #CWC19 pic.twitter.com/wMy3JGnh9S
— Mumbai Indians (@mipaltan) April 16, 2019
गुरुवारी मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला ४० धावांनी हरवले. सामना संपल्यानंतर ललिथ मलिंगाने दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीची स्तुती केली. त्याच्या मते हार्दिक एक उत्तम फलंदाज आहे. जगातील कोणत्याही गोलंदाजाचा चेंडू सिमेबाहेर मारण्याची क्षमता त्याच्यात आहे. शिवाय सध्या तो जोरदार फॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात गोलंदाजी करायलाही मला आता भिती वाटते. अगामी विश्वचषक स्पर्धेत हार्दिक भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावताना दिसेल मात्र, यापुढे आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या विरोधात गोलंदाजी करणे माझ्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
गुरुवारी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत मुंबई इंडियन्स, बाराव्य हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला.