Rohit Sharma on Yuzvendra Chahal: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मारताना दिसत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि युजवेंद्र चहल हे दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. दरम्यान, रोहित शर्माने डगआऊटमध्ये बसलेल्या चहलसोबत मस्ती केली. भारताच्या पराभवानंतर टीम कॉम्बिनेशनवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रोहित शर्माचा मजा मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चहलसोबत विराट कोहली आणि जयदेव उनाडकटही बसलेले दिसत आहेत. दरम्यान, रोहित शर्मा तिथे येतो आणि भारतीय कर्णधार चहलला मजेशीर पद्धतीने मारायला लागतो. आधी त्याने एक चापट मारली आणि मग नंतर चहलच्या मानगूट धरली आणि पकडून मारायला लागला. हे सुरु असताना विराट कोहलीचे हावभाव पाहण्यासारखे होते.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

चहल आणि रोहित यांच्यातील मजामस्ती पाहून जयदेव उनाडकट हसायला लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने फिरत आहे. व्हिडिओ शेअर करून कोणीतरी याला रोहित शर्मा आणि चहल यांच्यातील सर्वोत्तम बाँड म्हणत आहे, तर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत होता.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट-रोहित खेळणार का?

तिसर्‍या आणि शेवटच्या वन डेसाठी कोहली आणि रोहित परतणार की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेपेक्षा मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवून संघ अंतिम सामन्यातही प्रयोग करत राहील, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले. राहुल द्रविड म्हणाला की, “मला वाटते की आपण नेहमीच मोठे गोष्ट पाहू. या टप्प्यावर, आशिया चषक आणि विश्वचषक येत आहेत, आणि आम्हाला आमच्या खेळाडूंना दुखापत झालेली अजिबात परवडणारी नाही. आम्ही नवीन खेळाडूंना आजमावून पाहत आहोत.”

हेही वाचा: World Cup 2023: मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी रंगणार महामुकाबला

निर्णायक सामना त्रिनिदाद येथे होणार आहे

वास्तविक, दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये चहलचा भारतीय इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. आता मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसर्‍या वन डेत रोहित आणि कोहली भारतीय इलेव्हनमध्ये परततील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर कुलदीपने आतापर्यंतच्या मालिकेत शानदार गोलंदाजी केली आहे, त्यामुळे चहलला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळणे अशक्य आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना १ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.