Rashid Khan, World Cup 2023: अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाज आहे. तो जितका चांगला गोलंदाज आहे तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. याचा पुरावा त्याने अनेकदा त्याच्या चांगल्या स्वभावाने दिला आहे, पण आज त्यांनी याचा आणखी एक पुरावा दिला आहे. वास्तविक राशिद खानने वर्ल्ड कपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी दान करण्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आपली रक्कम दान केली आहे.

राशिद खानने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याची घोषणा केली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरत, फराह आणि बादघिस) झालेल्या भूकंपाच्या वाईट परिणामांबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न समर्पित करत आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये मिळणारी मॅच फी दान करत आहे. आम्ही लवकरच एक फंड रेसिंग मोहीम सुरू करणार आहोत, ज्याद्वारे आम्ही पीडितांना मदत करू शकणार्‍यांकडून मदत घेऊ.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

खरं तर, शनिवारी अफगाणिस्तानमध्ये एक जगाला हादरवणारा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र विध्वंसाचे दृश्य पसरले. अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ९००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील या भूकंपामुळे मृत आणि जखमी झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा सुपरस्टार राशिद खान सध्या भारतात आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळत आहे, परंतु त्याला आपल्या देशवासियांची खूप काळजी आहे, आणि म्हणूनच त्याने विश्वचषकाची संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाला या सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे. अरुण जेटली स्टेडियम (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली पिच रिपोर्ट) च्या खेळपट्टीवर कोणाची मदत, गोलंदाज किंवा फलंदाज कोणाला मिळेल ते जाणून घेऊया.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ निर्णयामुळे सचिन तेंडुलकर झाला आश्चर्यचकित, सामना संपल्यानंतर संघातील चुकांवर केलं भाष्य

अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल

अरुण जेटली स्टेडियम हे फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी, लहान चौकार आणि वेगवान आउटफिल्डसाठी प्रसिद्ध आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर दोन्ही डावात ७०० हून अधिक धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने ४२८ धावा केल्या तर श्रीलंकेने प्रत्युत्तरात ३२६ धावा केल्या. अशा स्थितीत या सामन्यातही मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. दव पडल्यामुळे प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधाराने येथे गोलंदाजी करणे पसंत केले.