जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने मियामी टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. बक्षीस रकमेच्या मुद्दय़ावरून ठाम भूमिका घेणाऱ्या सेरेनाने अमेरिकेच्या क्रिस्तिना मॅकहालेवर ६-३, ५-७, ६-२ असा विजय मिळवला. तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला विजयासाठी दोन तास आणि सात मिनिटे एवढा संघर्ष करावा लागला. पुढच्या फेरीत सेरेनाचा मुकाबला कझाकस्तानच्या झरिना दियासशी होणार आहे. सेरेनाने १३ बिनतोड सव्‍‌र्हिसच्या बळावर बाजी मारली. पेट्रा क्विटोव्हाने अमेरिकेच्या इरिना फाल्कोनीवर ६-१, ६-४ अशी मात केली. पुढच्या फेरीत तिची लढत एकाटेरिना माकारोव्हाशी होणार आहे. वाइल्डकार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या इंग्लंडच्या हिदर वॉटसनने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफन्सचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला. डेनिस इस्टोमिनने बोर्ना कोरिकचा ४-६, ७-५, ७-५ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सानियाची आगेकूच, बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना मियामी टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. सानिया-मार्टिना जोडीने लारा अरुबारेना आणि रालुका ओलारू जोडीवर ६-०, ६-४ असा विजय मिळवला. भारताच्या रोहन बोपण्णाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पाब्लो क्युवेस आणि मार्केल ग्रॅनोलर्स जोडीने बोपण्णा-मर्गेआ जोडीवर मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams
First published on: 26-03-2016 at 04:03 IST