Asia Cup 2025 Shaheen Shah Afridi on Suryakumar yadav Claim: भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गट टप्प्यातील आणि सुपर फोरमधील एकही सामना भारताने गमावलेला नाही. तर पाकिस्तानवर टीम इंडियाने दोन वेळा एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या भारत-पाकिस्तानमध्ये रायव्हलरी उरलेली नाही, या वक्तव्यावर त्याने आपलं मत मांडलं आहे.
पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्सने संघाने विजय मिळवला. पण तरीही पाकिस्तानचा संघ काही सुधारलेला नाही. गोलंदाजी शाहीन आफ्रिदीने आता टीम इंडियाला धमकी दिली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोन सामने गमावल्यानंतरही भारताला हरवण्याची धमकी दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर शाहीन आफ्रिदीने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला काय कोणत्याही संघाला हरवू शकतो असं मोठं विधानदेखील केलं आहे. पण पाकिस्तानचा संघ स्वत: अजून अंतिम फेरीत पोहोचलेला नाही, ही महत्त्वाची बाब. भारत-पाकिस्तान आशिया चषकातील अंतिम सामना होऊ शकतो याचं काय समीकरण आहे, पाहूया.
शाहीन आफ्रिदी सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सूर्यकुमार यादवच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर बोलताना शाहीन आफ्रिदी म्हणाला, “त्याला (सूर्यकुमार यादव) जे बोलायचं ते बोलू द्या, तो त्याचा दृष्टिकोन आहे. पण सध्या ना भारतीय संघ ना आम्ही कोणीच अंतिम सामन्यात पोहोचलं नाहीये. अंतिम फेरीत पोहोचली की त्यांना बघून घेऊ. आम्ही इथे खेळण्यासाठी आणि आशिया चषक जिंकण्यासाठी आलोय आणि त्यावरच आमचा पूर्ण फोकस आहे.”
सुपर फोरमधील भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला होता, “खरंतर तुम्ही या ‘रायव्हलरी’बाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण, जर दोन संघ १५-२० सामने खेळलेत आणि स्कोअरलाइन ७-७ किंवा ८-७ अशी असेल, तर त्याला रायव्हलरी म्हणता येईल. पण जर स्कोअरलाइन १०-१ किंवा १३-० अशी असेल, मला नक्की आकडा माहित नाही हा… तर मग ती रायव्हलरीच उरत नाही.”
पाकिस्तान संघाला आशिया चषक सुपर फोर टप्प्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला, तर श्रीलंकेविरूद्ध त्यांनी विजय मिळवला. आता पाकिस्तानचा बांगलादेशविरूद्ध एक सामना बाकी आहे. जर बांगलादेशने पाकिस्तानचा या सामन्यात पराभव केला तर पाक संघ अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. तर भारतीय संघाने त्यांच्य तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला तर संघ अंतिम फेरीचं तिकिट मिळवेल.