Shahid Afridi on Jay Shah: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्या पाकिस्तानमधील ‘सुरक्षेच्या चिंतेबाबत’ वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी संतापला आहे. वास्तविक, जय शाहांच्या वक्तव्यानंतर शाहिदने सोशल मीडियावर पाकिस्तानमध्ये झालेल्या मागील काही काळातील मालिकांची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामागील कारण म्हणजे भारताने आशिया कप २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारताचे सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले जात आहेत. तसेच, आगामी काळात २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनही पाकिस्तानला करायचे आहे.

पाकिस्तान आशिया चषक २०२३चे आयोजन करत आहे, तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या घरी फक्त ४ सामने आयोजित करू शकले. कारण, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलवर आशिया कप खेळावा लागला. दुसरीकडे, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी पाकिस्तानमध्ये आशिया कप न खेळण्याचे सर्वात मोठे कारण उघड केले आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर पाकिस्तानने किती मालिका आयोजित केल्यात याची आकडेवारी दिली आहे. आशिया चषकाचे बहुतांश सामने श्रीलंकेत खेळले जात असून, तेथे पावसाचा परिणाम सामन्यांच्या निकालावर होत आहे. कोलंबोमध्ये संततधार पावसामुळे पुन्हा एकदा आशिया चषक सामना पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याची मागणी करण्यात आली, जी ACCने मान्य करण्यास नकार दिला. यावर शाहिद आफ्रिदीने जय शाह यांच्यावर सडकून टीका केली.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होणार? BCCI अध्यक्षांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “यावर निर्णय…”

शाहिद आफ्रिदीने पीसीबीने केलेल्या मालिकांच्या आयोजनाची सांगितली आकडेवारी

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियाच्या त्याच्या वैयक्तिक ट्वीटर अकाऊंटवर एक ट्वीट केले, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानने आयोजित केलेल्या मालिकांची आकडेवारी दिली आहे. त्याने लिहिले की, “पाकिस्तानमधील सुरक्षेबाबत जय शाह यांचे विधान मला मिळाले आहे. त्यांच्या स्मृती ताज्या करण्यासाठी, पाकिस्तानने गेल्या सहा वर्षांत खालील परदेशी खेळाडू आणि संघांचे यजमानपद भूषवले आहे. शाहा साहेब यात काही शंका तर नाही ना. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे आदरातिथ्य करण्यासाठी पाकिस्तान तयार आहे.

पीसीबीची गेल्या ६ वर्षात या मालिकांचे यजमानपद भूषवले

२०१७ – आयसीसी वर्ल्ड इलेव्हन आणि श्रीलंका

२०१८ – वेस्ट इंडिज

२०१९– वेस्ट इंडिज (पब्लू), बांगलादेश (प) आणि श्रीलंका

२०२० – बांगलादेश, PSL, MCC आणि झिम्बाब्वे

२०२१ – वेस्ट इंडिज, PSL, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज

२०२२ – ऑस्ट्रेलिया, PSL, वेस्ट इंडीज, बांगलादेश U19, आयर्लंड (W) आणि इंग्लंड (२ कसोटी)

२०२३ – न्यूझीलंड (२ कसोटी), PSL, महिलांचे प्रदर्शनीय सामने, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आणि आशिया कप २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका (w)

पाकिस्तानचा माजी खेळाडूने पुढे लिहिले की, “पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवर विधान करणाऱ्या जय शाह यांना सांगू इच्छितो की, जरा आपल्या डोक्यातील वाईट विचारांची जळमटं बाजूला काढा. पाकिस्तानने मागील ६ वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय संघांसोबत घरच्या मैदानावर खूप मालिका खेळल्या आहेत. पाकिस्तान हा सुरक्षित देश असून उगाच अफवा पसरवू नका.”

हेही वाचा: IND vs NEP: विराट कोहलीला मेडलच्या बदल्यात आसिफ शेखकडून हवे मेडल! सामन्यानंतरचा ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

जय शाह यांनी सुरक्षेच्या चिंतेबाबत विधान केले होते.

जय शाह यांनी मंगळवारी एका निवेदनात म्हटले होते की “सर्व पूर्ण सदस्य, मीडिया हक्क धारक आणि स्टेडियमचे मालक सुरुवातीला पाकिस्तानमध्ये संपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यास घाबरत होते. “पाकिस्तानमध्ये असुरक्षितता असल्याने त्यांनी तिथे जाण्यास नकार दिला. देशातील सुरक्षा व्यवस्था आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित कारणामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर घ्यावी लागली आहे.”

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान करणार आहे

आशिया चषक २०२३ नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे आयोजन करण्याची जबाबदारी पाकिस्तानकडे आहे. पण जेव्हा भारताने आशिया कप २०२३साठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता, तेव्हा भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला कसा जाऊ शकतो? येणाऱ्या काळात २०२५ मध्ये भारत पाकिस्तानात जाणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.